What Is Halal And Jhatka Meat: भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी झटका मटण दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे. सध्या बाजारात दोन प्रकारचे मटण-चिकन मिळतात. एक झटका प्रकार असतो तर एक हलाल प्रकार असतो. पण एकाच प्राण्याचे मांस मात्र या दोन्ही प्रकारांमध्ये फरक काय? असा सवाल तुमच्याही मनात येत असेल. तर आज जाणून घेऊया हलाल आणि झटका मांस यातील फरक काय आहे ते.
हलाल आणि झटका ही मांस कापण्याची एक पद्धत आहे. हलाल शब्द हा अरबी आहे. त्याचा हिंदीत अर्थ मान्य असा आहे.
हलाल मांस म्हणजे काय?
हलाल पद्धतीने जनावरांची कत्तल करणे म्हणजे जनावराच्या मानेवरील रक्तवाहिनीवर एक कट मारला जातो. त्यामुळं प्राण्याच्या शरीरातील सर्व रक्त बाहेर येते. पण या प्रक्रियेत प्राण्याचा तडफडून मृत्यू होतो. इस्लामिक श्रद्धेनुसार, फक्त हलाल मांसच खाऊ शकतात. हलाल करताना जनावराच्या शरीरातून संपूर्ण रक्त बाहेर पडण्याची वाट पाहिले जाते. तसंच, प्राणी मेल्यानंतर त्याच्या शरीराचे वेगवेगळे हिस्से केले जातात. या प्रक्रियेला जिबाह असंही म्हणतात. बकरी ईदला हलाल पद्धतीने मेंढ्या आणि बकऱ्यांचा बळी दिला जातो. त्यासाठी प्राणी निरोगी आणि जिवंत असणे गरजेचे आहे.
इस्लामप्रमाणेच ज्यूदेखील हलाल प्रकारचे मटण खातात. त्यांला कोशेर असं म्हणतात. दोन्ही धर्मांमध्ये अशा प्रकारे प्राण्यांची कत्तल त्या त्या धर्माच्या व्यक्तीनेच करणे बंधनकारक असते. सोबतच दोन्ही प्रकारच्या प्रक्रियेत डुक्कर हा प्राणी वर्ज्य असतो.
झटका मांस म्हणजे काय?
झटका मांस म्हणजे एकाच झटक्यात प्राण्याची मान धडापासून वेगळे करणे. झटक्यातील प्राण्याला मारण्यापूर्वी त्याला बेशुद्ध केले जाते. प्राण्याला मरण्यापूर्वी जास्त वेदना होऊ नयेत, हा त्यामागचा उद्देश असतो. तसंच, झटका पद्धतीने मांस कापण्यापूर्वी झटक्याला उपाशी ठेवले जाते. झटका पद्धत हिंदू आणि शीख धर्मात वापरली जाते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)
