12th Board Exam: बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानाचा यंदाही फज्जा उडाला . यावर्षी छत्रपती संभाजीनगरमध्ये परिक्षेदरम्यान कॉप्यांचा महापूर दिसून येतोय. वैजापुरात भरारी पथकाच्या धाडीत 125 विद्यार्थी सामुहिक कॉपी करताना आढळले. बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त होत आहेत की कॉपीयुक्त होत आहेत असा प्रश्न पडावा इतकं विदारक चित्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिसलं. संभाजी नगरच्या जटवाडा आणि वैजापूरमध्ये सामुहिक कॉपीचा प्रकार करून बोर्डाच्या कॉपिमुक्त अभियानाला विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण संस्थेनं हरताळ फासला . भरारी पथकाने केलेल्या पाहणीत सामुहिक कॉपीचा प्रकार समोर आला.
संभाजीनगरमध्ये कॉपीचा सुळसुळाट
राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयात सुरु होती सामूहिक कॉपी. 125 विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये बसवून कॉपी करत होते. भरारी पथकाची परीक्षा केंद्रावर धाड. संस्था सचिवाच्या कार्यालयात झेरॉक्स मशिन आढळल्या. 124 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत एकसारखच उत्तर आढळलं. निमगावच्या कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयात कॉपीचा प्रकार घडला. परीक्षा हॉलच्या खिडक्यांबाहेर गाईड, स्पार्क गाईड, मायक्रो झेरॉक्स, नवनीतसह कॉप्यांचा खच होता.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संस्थेचे अध्यक्ष, सचिव, केंद्र संचालकांसह 17 पर्यवेक्षकांविरुद्ध गुन्हे नोंदवल्याची माहिती शिक्षणाधिकारी लाठकर यांनी दिली.
निमगाव कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयात कॉपीचा प्रकार उघड
निमगावच्या कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षा केंद्राला माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या भरारी पथकाने भेट दिली. हे पथक केंद्रावर पोहोचताच हॉलच्या खिडक्यांमधून कॉप्याचा पाऊस पडून खाली ढिगारा साचला होता. त्यात गाईड, स्पार्क गाईड, मायक्रो झेरॉक्स, नवनीतसह कॉप्यांचा खच होता. शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संस्थेचे अध्यक्ष, सचिव, केंद्र संचालकांसह 17 पर्यवेक्षकांविरुद्ध गुन्हे नोंदवल्याची माहिती शिक्षणाधिकारी लाठकर यांनी दिली. बारावीच्या परीक्षेत गुरुवारी जीवशास्त्र विषयाचा पेपर होता. इमारतीच्या आजूबाजूला परीक्षा दालनाबाहेर कॉप्याचा ढीग लागल्याचं दिसून आलं.
इमारतीच्या आजुबाजुला , परिक्षा दालनांबाहेर कॉप्याचा ढीग बघून खरच या बोर्डाच्या परिक्षा आहेत का असा प्रश्न पडावा इतक भयानक चित्र होत, त्यामुळे कॉपीमुक्त अभियान खरचं राबवायचं असेल तर नियम आणि शिक्षा कठोर होण्याची गरज व्यक्त होतीये.
