
Uddhav Thackeray Interview : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेच्या (Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance) पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत असणार की नाही, याबद्दल सामानाला दिलेल्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी मोठं विधान केलंय.
महापालिका निवडणुकीत एकाला चलो रे?
ठाणे, मुंबईसह येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत आम्ही जिंकण्याच्या तयारीने मैदानात उतरणार असल्याचही एल्गार उद्धव ठाकरेंनी केला आहे. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत असेल की नाही याबद्दलही उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगून टाकलं. ते म्हणाले की, हा ज्याचा त्यांचा प्रश्न आहे. मध्यंतरी काँग्रेसशी बोलणं झालं, ते म्हणाले की, कदाचित ते स्थानिक पातळीवर विषय सोडतील. ठिक मग तसं असेल तर तसं करु. मी मुंबईला राजकीयदृष्ट्या पण महाराष्ट्रपासून वेगळी समजणार नाही. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचा वेगळा विचार आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार होऊ शकतं नाही. राज्य म्हणून प्रत्येक महापालिका ज्या आहेत, त्यांची स्वत:ची स्वायत्तता आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या त्या त्या पक्षाला जे योग्य वाटत असेल तसं करायचं असेल तसं करू, लढायचं तर नक्कीच आहे.
मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच झेंडा!
मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच झेंडा फडकणार असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. मराठी माणसाच्या हातात मुंबई राहू नये, हा त्यांचा केवीलवाना प्रयत्न आहे. म्हणून मध्ये मध्ये ज्यांना काही किंमत नाहीय अशा लोकांकडून आम्हाला म्हणजे मराठी लोकांना मराठी भाषिकांना पेटवण्यासाठी आवाहानाची भाषा करतात. त्यांच्या या गोष्टींचा काही फरकच पडत नाही. इथले जे मराठी आणि अमराठी भाषिक आहेत ते गुणागोविंदाने राहत आहेत. अगदी रक्तदान शिबिर जे शिवसेना करते ते आम्ही कोणत्या भाषिक करत आहे असं काही पाहत नाहीत.
मुख्यमंत्र्यांना हा माझा टोमणा नाही तर…
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हा मी गुच्छा दिला होता, तेव्हाच आणि तेवढीच भेट झाली. आता सध्या त्यांच्या सहकारी, मंत्र्यांचा जे काही भानगंडी लफडी सुरु आहेत, ती मुख्यमंत्र्यांनी मोडीत काढली पाहिजे. हे मी त्यांनी कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय की, हा टोमणा नाही सल्ला आहे. जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काही आजूबाजूला चालले आहे, अगदी त्यांच्या प्रतिमेला तडा देणारी कामं आहेत. बॅगेतील पैसे, कुठे धक्काबुक्की तर कुठे जमिनी लाटल्या जात आहेत, हे सगळं जे काही चाललं आहे, याचे प्रमुख म्हणून बदनाम शेवटी देवेंद्र फडणवीस होत आहे. आपण जे म्हणतो नो दिव्या खाली अंधार तसा हा प्रकार आहे.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र जसा लोकसभेच्या वेळी जागा झाला होता, तसा तो परत जागा झाला पाहिजे. नाही तर त्यावेळी आम्ही सांगत होतो की, महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहे. मराठी माणूस मुंबईतून बाहेर काढला जातोय. आता जाग नाही आली तर आपले डोळे कधीच उघडणार नाही.