Nashik Crime News: पुरोगामी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेतून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. नाशिकमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशकात भोंदूगिरी करणाऱ्या बाबाचा कारनामा उघड झाला आहे. या भोंदू बाबाने विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जादूटोण्याची भीती दाखवत हा भोंदूबाबा गेल्या 14 वर्षांपासून या महिलेवर लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या भोंदूबाबाने महिलेच्या कुटुंबीयांची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात नाशिकच्या इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच, गणेश जगताप असं भोंदूगिरी करणाऱ्या बाबाचं नाव आहे.
पिडीतेच्या नवऱ्याला दारूचे व्यसन होते. त्याचे हे व्यसन सोडवण्यासाठी तिने भोंदूबाबाकडे मदत मागितली होती. पतीला दारूच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी पिडीता गणेश जगतापच्या संपर्कात आली होती. त्यानंतर अनेकदा जादूटोण्याची भिती दाखवत हा भोंदूबाबा महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता. महिलेने शारिरीक संबंध न ठेवल्यास कुटुंबातील एकाचा बळी जाईल, अशी धमकी वारंवार त्याला देण्यात येत होती.
तु मला आवडते तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो असा दबावदेखील त्याने महिलेवर आणला होता. तसंच, एका पुस्तकात पतीसह मुलांची नावे लिहली आहेत. जर माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीत तर पुस्तकातील नावांपैकी एकाचा बळी जाईल अशी धमकी भोंदूबाबाने पिडीतेला दिली होती.
पीडितेच्या तक्रारीवरुन या भोंदूबाबाविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरानगर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे. सध्या हा भोंदूबाबा फरार असून पोलिसांचे पथक त्याला शोधत आहेत.
FAQ
प्रश्न १: नाशिकमध्ये कोणत्या प्रकारची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे?
उत्तर: नाशिकमध्ये गणेश जगताप नावाच्या एका भोंदूबाबाने जादूटोण्याची भीती दाखवून एका विवाहितेवर १४ वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची आणि तिच्या कुटुंबीयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे.
प्रश्न २: आरोपी भोंदूबाबाचे नाव काय आहे?
उत्तर: आरोपी भोंदूगिरी करणाऱ्या बाबाचे नाव गणेश जगताप असे आहे.
प्रश्न ३: पीडित महिला आरोपीच्या संपर्कात कशाप्रकारे आली?
उत्तर: पीडितेच्या पतीला दारूचे व्यसन होते. हे व्यसन सोडवण्यासाठी मदत मागण्यासाठी ती भोंदूबाबा गणेश जगतापच्या संपर्कात आली होती.
