Holiday in March 2025: फेब्रुवारी महिना संपायला आलाय. 28 दिवसांचा हा महिना संपल्यानंतर मार्च महिना सुरु होईल. प्रत्येक महिन्यात पेट्रोल डिझेलच्या दरांपासून बॅंकांच्या नियमांपर्यंत काही ना काही बदलत असते. या सर्वात शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सर्वात जास्त उत्सुकता आगामी महिन्यात सुट्ट्या किती असणार याची असते. मुलांना सुट्ट्यांमध्ये मज्जा करायला मिळते आणि पालकांना त्याअनुषंगाने फिरण्याचे प्लान आखता येतात. मार्च महिन्यात किती सुट्ट्या असतील? सविस्तर जाणून घेऊया.
मार्च महिन्यात होळीपासून ईद उल फितरपर्यंत अनेक सुट्ट्या आहेत. जेव्हा शाळा बंद असतील. प्रत्येक राज्यातील सुट्ट्या या तिथल्या स्थानिक सणांवर ठरतात. त्यामुळे राज्यांनुसार या सुट्ट्या बदलत जातात. शाळांना कधी सुट्ट्या असतील? सविस्तर जाणून घेऊया.
मार्च महिन्यात किती दिवस सुट्ट्या?
मार्च महिन्यात होळीपासून जमात उल विदा, गुढी पाडवा आणि ईद उल फितर सारखे प्रमुख सण आहेत. 13 मार्चला गुरुवारी होलिका दहन आणि 14 मार्चला शुक्रवारी होळी आहे. या 2 दिवसात शाळांना लागोपाठ सुट्ट्या असतील. तर 28 मार्चला शुक्रवारी जमात उल विदाची सुट्टी शालेय विद्यार्थ्यांना असेल. यानंतर 30 मार्चला रविवारी गुढी पाडवा आणि 31 मार्चला सोमवारी ईद उल फितरची सुट्टी असेल. या दिवशी शाळा बंद असतील.
महिन्यातील 4 रविवार शाळांना सुट्टी असते. याव्यतिरिक्त काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शनिवारचीदेखील सुट्टी असते. अशा विद्यार्थ्यांना मार्चमध्ये या सुट्ट्यांचा आनंदही घेता येणार आहे.
एप्रिल महिन्यात रविवार, 6 एप्रिल रोजी राम नवमीची सुट्टी, 10 एप्रिलस गुरुवारी महावीर जयंतीची सुट्टी आणि 18 एप्रिल शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी असणार आहे.
वर्षातून दोन वेळा होणार 10 ची परीक्षा; फेब्रुवारी-मार्चपासून सुरुवात
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या परीक्षा पद्धतीत एक मोठा बदल आणला आहे. बोर्डाच्या ताज्या निर्णयानुसार, 2026 पासून, सीबीएसई वर्षातून दोनदा दहावीच्या बोर्ड परीक्षा घेईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्याची अतिरिक्त संधी मिळेल.ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाईल, पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्चमध्ये होईल. नव्याने मंजूर झालेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दहावीच्या बोर्ड परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जातील. पहिला टप्पा फेब्रुवारी ते मार्च दरम्यान होईल, तर दुसरा टप्पा मे मध्ये होणार आहे. दोन्ही परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश करतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे आणि कौशल्यांचे सर्वसमावेशक मूल्यांकन सुनिश्चित होईल.नवीन नियमांनुसार, बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील, तर प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मूल्यांकन वर्षातून फक्त एकदाच घेतले जातील. या नवीन रचनेचा उद्देश विद्यार्थ्यांना अधिक लवचिकता प्रदान करणे आणि एकाच वार्षिक परीक्षेशी संबंधित दबाव कमी करणे आहे. विद्यार्थ्यांना दोन्ही सत्रांमध्ये उपस्थित राहण्याची आणि त्यांच्या तयारीसाठी सर्वात योग्य सत्र निवडण्याची संधी मिळेल.
अधिकृत माहितीनुसार, मसुदा नियम आता सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवले जातील आणि भागधारक 9 मार्चपर्यंत त्यांचे अभिप्राय देऊ शकतात, त्यानंतर धोरण अंतिम केले जाईल. मसुद्याच्या नियमांनुसार, परीक्षेचा पहिला टप्पा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान होईल, तर दुसरा टप्पा 5 ते 20 मे दरम्यान होणार आहे.
