Dhananjay Munde: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती. सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत राजीनाम्याची घोषणा केली आहे. मात्र त्या ट्विटमध्ये त्यांनी राजीनामा प्रकृती अस्वस्थामुळं दिला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी दोन महिन्यांपासून होत आहे. या दोन महिन्यात धनंजय मुंडे कसे अडचणीत आले आणि नेमकं काय-काय घडलं हे जाणून घेऊया. संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊयात.
– वाल्मीक कराड निकटवर्तीय असल्याचं स्वतः धनंजय मुंडे यांनी मान्य केले होते. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे एकत्रित असलेले आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातील पुरावे अंजली दमानिया यांनी माध्यमांना दिले होते.
– व्यंकटेश्वरा या साखर कारखान्यात मुंडे कराड यांची भागीदारी
– मंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरूनच लाडकी बहीण योजनेच्या समितीवर कराडची अध्यक्ष म्हणून निवड
– पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून वाल्मीक कराडशिवाय धनंजय मुंडे यांचे पाने हालत नाही असा उल्लेख करणे
-12 डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात अशा घटना केवळ बीड जिल्ह्यातच घडतात का? असा सवाल मुंडेंनी उपस्थित केला होता
– आरोप असताना देखील 15 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांची मंत्री पदावर वर्णी लागली.
– वाल्मीक कराड याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून सरेंडर होईपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप
– सरेंडर होत असताना व्हीआयपी गाडीमधून सीआयडी ऑफिसमध्ये सोडले
– वाल्मीक कराडच्या नावावर कोट्यावधीची संपत्ती आणि त्याचे कनेक्शन मंत्री मुंडे यांच्याशी असल्याचा दावा
– धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराडला पालकमंत्री पद आणि मंत्रीपद भाड्याने दिले होते असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला होता
– कृषी विभागातील बदली घोटाळ्यात वाल्मीक कराड यांच्याकडूनच प्रक्रिया पूर्ण करून घ्या. यात पुराव्यासह सुरेश धस यांनी मांडले होते. त्या नंतर धनंजय मुंडे यांना स्वपक्षीयातूनच विरोध दर्शविण्यात आला यात प्रामुख्याने प्रकाश सोळंके यांनी राजीनामाची मागणी केली होती.
– खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया यांनी राजीनामाची मागणी कायम ठेवली. करुणा शर्मा मुंडे यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मीक कराड यांनी मारहाण केली असा आरोप करण्यात आला. करुणा मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले.
– परळी मधील अवैध धंद्यांना पाठबळ कोणाचे यावरून विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांचा धनंजय मुंडे यांच्याकडे निशाणा. राख वाळू माफिया बीड मधील पोलीस दलाचे वाल्मीक कराड याच्या संदर्भातील संबंध आणि त्यावरून बीडच्या पोलीसदलाचा आका कोण? असा आरोप करण्यात आला.
– कृषी विभागातील 300 कोटीच्या खरेदी घोटाळ्यावरून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप
– पिक विम्यातील घोटाळ्यात परळी हब असल्याचा विरोधकांचा आरोप.
– परळी मधील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्ये प्रकरणात आरोपी पकडण्यात व राजकीय दबाव असल्याचा मुंडे कुटुंबाचा आरोप
-परळीमधील जमीन खरेदीमध्ये सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले गंभीर आरोप.
– हार्वेस्टर घोटाळ्यामध्ये धनंजय मुंडे यांचे नाव.
– खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या शासकीय सातपुडा बंगल्यावर पवनचक्की कंपनीची बैठक.
– विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण व उमेदवाराला धक्काबुक्की.धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या या गंभीर आरोपामुळे धनंजय मुंडे यांचा पाय खोलात गेला.
