
Gold Price Today: गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरातील वाढ सुरूच आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. आज ईददेखील आहे त्याचबरोबर मार्चअखेर आहे. त्यामुळं सोन्याचे दर चढले आहेत. मागील एका आठवड्यात सोन्याच्या दरात 1300 रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आजही किंचिंतशी वाढ झाली आहे.
आज 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 710 रुपयांनी उसळला असून किंमत 92,060 रुपयांवर पोहोचली आहे. तर, 24 कॅरेट प्रति 100 ग्रॅमचा भाव आज 7100 रुपयांनी वाढला असून सराफा बाजारात सोनं 9,20,600 रुपयांवर पोहोचले आहे. तर, 30 मार्च रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 91,350 रुपयांवर स्थिरावला होता.
देशातील सर्वच शहरात 24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 90 हजारांवर पोहोचले आहेत. तर, 22 कॅरेट सोनं 10 ग्रॅम 82 हजार रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीच्या दरातदेखील वाढ झाली आहे. देशात एक किलो चांदीचे दर 1,03,900 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.
सराफा बाजारात आज मुंबईत 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा 9191 रुपये आहेत. तर, 18 कॅरेट सोन्याचा दर 530 रुपयांनी वाढून69,060 रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 82,360 रुपये इतका आहे.
दरम्यान, एका वर्षात सोन्याचा भाव 22 हजारांनी वाढला आहे. नवीन वर्षात सोनं 9 हजारांवर पोहोचलं आहे. रशिया युक्रेन युद्ध, आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेली अस्थिरता, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय अशा वेगवेगळ्या गोष्टींचा सोन्या-चांदीच्या दारावर परिणाम झाला असून दरात वाढ झाली असल्याच सुवर्ण व्यवसायिक यांचे म्हणणे आहे
सोन्याचे वर्षभरात वाढलेले दर
मार्च 2024 – सोन्याचे दर 60 हजार 800 रुपये प्रति तोळे
नोव्हेंबर – 2024, सोन्याचे दर 70 हजार 700 रुपये
जानेवारी – 2025 सोन्याचे दर 74 हजार 600 रुपये
मार्च 2025 – सोन्याचे दर 92 हजार 200