
Jagdeep Dhankhad: देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.आरोग्याच्या कारणास्तावर राजीनामा देत असल्याचं धनखड यांनी म्हटलंय. मात्र धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर देशभरात जोरदार राजकीय चर्चा सुरू झालीय.
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं धनखड यांनी नमूद केलाय. मात्र जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर देशभरात जोरदार राजकीय चर्चा सुरू झालेत.
धनखड यांनी राजीनामा देण्यासाठीही अधिवेशनाचा पहिलाच दिवस निवडलाय. त्यावरूनही विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. पडद्यामागे मोठं राजकारण सुरू आहे आणि ते लवकरच उघड होईल.उपराष्ट्रपतींचा राजीनामा ही काही सामान्य घटना नसल्याचं म्हणत खासदार संजय राऊत यांनी आगामी काळातील राजकीय भुकंपाचं भाकीत केलंय.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेत भाजपचे सभागृह नेते जे पी नड्डा यांनी उपराष्ट्रपतींचे अधिकार आपल्या हातात घेत पदाचा अवमान केल्याचं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपतींनी राजीनामा देणं ही धक्कादायक बाब असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय. जर प्रकृती साथ देत नसेल तर पदाला न्याय देता येणार नाही. म्हणूनच राजीनामा दिला असेल असं मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे यात संशय घेणं योग्य नसल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलंय.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. विरोधकांनी यावरून सरकारच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधलाय. तर दुसरीकडे धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जातायत.