
महाराष्ट्रात सध्या महा’राज’कारण सुरु आहे. ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरेंनी एक फेसबुक पोस्ट केली. राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख केलेल्या शिवसेना आणि पक्षप्रमुख या दोन शब्दांमुळे एकनाथ शिंदे यांची धडधड वाढली आहे. तर, दुसरीकडे शिवसेना एकच आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं आहे.