
मनोज कुळकर्णी (प्रतिनिधी) मुंबई : वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळी प्रकरणात हगवणेंना मदत करणारे आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर अडचणीत आलेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता सुपेकर यांच्यावर अनेक आरोप केलेत. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या पाठोपाठ दमानिया यांनी केलेल्या आरोपांमुळे आता जालिंदर सुपेकर गोत्यात आले आहेत.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणेंना मदत करणारे आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकरांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेत. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुपेकरांवर आरोपांचा बॉम्ब फोडलाय.. त्यामुळे जालिंदर सुपेकर गोत्यात आलेत. जालिंदर सुपेकर हे प्रत्येक पीआयकडून दिवाळीला एक तोळं सोनं आणि पैसे घेत असल्याचा खळबळजनक आरोप दमानिया यांनी केलाय. सुपेकर हे प्रत्येक पोलिस स्टेशनमधून वसूली करायचे. आणि त्यामुळे एका पीएसआयने आत्महत्याही केल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.
जालिंदर सुपेकर हे कैद्यांकडेही पैशांची मागणी करत होते. सुपेकरांनी एका कैद्याकडे 500 कोटी रुपयांची मागणी केली होती. आणि पैसे न दिल्यास जेलमध्येच सडत ठेवण्याची धमकी त्या कैद्याला दिल्याचा आरोपही अंजली दमानिया यांनी केला आहे. आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर आतापर्यंत अनेक आरोप करण्यात आलेत. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यानंतर अंजली दमानिया यांनीही सुपेकरांवर अनेक आरोप केले.
आयपीएस सुपेकरांवर झालेले आरोप :
1. वैष्णवी हगवणे प्रकरणात सुपेकरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना दिला
2. वैष्णवी छळ प्रकरणात हगवणे कुटुंबाला मदत
3. कारागृहांसाठी रेशन, कॅन्टीन साहित्य आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत भ्रष्टाचार
4. कैद्यांच्या दिवाळी फराळात मोठा भ्रष्टाचार
5. सुपेकर पीआयकडून एक तोळं सोनं आणि पैसे घ्यायचे
6. कैद्याकडे 500 कोटींची मागणी
7. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यांसाठी लाखो रुपये घेत होते
8. जालिदंर सुपेकरांच्या त्रासाला कंटाळून एका पीएसआयची आत्महत्या
एक ना अनेक आरोप जालिंदर सुपेकर यांच्यावर आतापर्यंत करण्यात आले आहेत. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आता या प्रकरणात अंजली दमानिया या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत. यावर मुख्यमंत्री काय कारवाईचा बडगा उगारतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.