
Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत EVM बाबत प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी ते म्हणाले की मुळात ईव्हीएम का आणलं ? मतमोजणीचा वेळ वाचवायला. मग एकेक महिना निवडणूक प्रक्रिया चालते, तो वेळ का धरत नाही? महाराष्ट्रात 1 मे रोजी मतदान झालं आणि बिहारमध्ये 30 मे रोजी होत असेल तर मधला वेळ गेलाच ना? चार दिवस मतमोजणीला जास्त लागले तर असं काय आभाळ कोसळतं? अमेरिका, युरोपमध्येही बॅलेट पेपरवर मतदान होतं. ते देश आपल्यापेक्षा मागास आहेत का? स्वतः मोदींचंही ईव्हीएमच्या विरोधात भाषण आहे. भाजपवाल्यांनी एकदा ती ऐकावं असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातील निकाल संशयास्पद
सामनाला दिलेल्या या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागल्यानंतर एवढं बहुमत मिळाल, जल्लोष कुठे झाला? अख्ख्या महाराष्ट्र जल्लोषाने नाहून निघायला पाहिजे होतं. तो अवाक् का झाला? अजून मला ग्रामीण भागातील लोक सांगतात की, आम्ही ठरवून तुम्हाला मतदान केलं. तरीदेखील आमच्या गावात एवढी कमी मत मिळूच शकत नाही.
मुळात काय झालं आहे, इव्हीएम हे जे आहे ना, तो हॅक होतो की नाही होत, हा एक भाग वेगळा. लोकशाही म्हणजे काय आयटीआयमध्ये जर मी समोरच्याची माहिती काढू शकतो मग मला माझी पूर्ण माहिती मिळाली पाहिजे ना. पूर्वी जे बॅलेट पेपर होते, त्याच्यात मी मतदान कोणाला केलं, माझं मत कोणाला जातंय हे शेवटपर्यंत मला कळत होतं.
पण आता काय होतं आहे, इव्हीएमवर मिशालीचं बटन दाबतोय, लाइट लागतंय. आतमध्ये पावती दिसतेय पण माझं मत तिसऱ्या ठिकाणी नोंदवलं जातंय. ते कुठे जातंय ते मात्र कळतं नाही. त्यामुळे माझं ठाम मत आहे, की मतदान हे मतपत्रिकेवरच झालं पाहिजे. तुम्ही इव्हीएम मशीन का आणली कारण वेळ वाचला पाहिजे. आजही अमेरिका, युकेमध्येही बॅलेट पेपर आहे. मग ते काही मागासलेले देश आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका होऊ द्या. त्यानंतर 500 जागा तुमच्या आल्यात तरी आम्ही काय बोलणार आहोत.