
Dog Gang Attack: दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडीओ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे असतात तर काही प्रेक्षकांना चांगले संदेश देणारे असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा एक CCTV व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक म्हणत आहेत की, ‘भारी मिस्टेक हो गया सरजी!’. या मजेशीर व्हिडिओमध्ये श्वानांची टोळी दिसत आहे. जी सुरुवातीला एका प्राण्यावर तुटून पडायला निघाली होती, पण पुढच्या क्षणाला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढताना दिसली.
खरंतर, ही श्वानांची टोळी मांजरी बघून तिच्या पाठलाग करत होती. जेव्हा ती टोळी धावत गेली तेव्हा ती मांजर नाही तर बिबट्या निघाला. मग काय, श्वानांच्या टोळीने जशी त्याच्या मागे धाव घेतली, तशीच धडपडत आणि घाबरत माघारी धावू लागावली.
व्हिडिओमध्ये काय?
ही संपूर्ण घटना 3 जुलैच्या रात्री 11 वाजता घडली आहे. सध्या याचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत आहे. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक बिबट्या रस्ता पार करताना दिसत आहे. त्या रस्त्यावर आधीपासूनच काही श्वानांची टोळी उभा आहे. त्यावेळी बिबट्या तेथील रस्ता पार करतो पण श्वानांच्या टोळीला ते मांजर असल्याचं वाटतं आणि सर्व जण मांजर समजून बिबट्याच्या मागे धावतात. त्यांना वाटतं की आपल्या परिसरात एक मोठी मांजर घुसली आहे. त्यामुळे सर्वजण मिळून त्या गल्लीत घुसतात. पण पुढे गेल्यावर त्यांना एक वेगळाच प्राणी दिसतो आणि ते सर्व घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी मागे फिरतात.
They thought it’s just a CAT
pic.twitter.com/EO6P9Z4ODi— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 15, 2025
हा व्हिडीओ @gharkekalesh या X हँडलवरून व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यावर लिहिलंय ‘त्यांना वाटलं बिल्ली आहे’. या व्हिडिओला 13 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 19 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं, पूर्ण श्वानांच्या टोळीची थू थू करून टाकली. दुसरा म्हणतो, वक्त बदल दिए.. जज्बात बदल दिए. तिसरा म्हणतोय की दूरून पाहिलं तर कॅटवॉक वाटलं, जवळ गेल्यावर जंगल वॉक! तर काहींनी तर अंदाज लावला की एक तरी गेला असावा!