
Pune Rave Party: पुण्यातील खराडीतील एका उच्चभ्रू भागात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकल्याची बातमी समोर आली आहे. या कारवाईत एकनाथ खडसे यांच्या जावाई प्राजंल खेवलकर यांच्यासह 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. खराडीतील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावानं हे रेव्ह पार्टी सुरु होती.घटना स्थळावरुन पोलिसांनी अमली पदार्थ, मद्य तसंच हुक्का जप्त केला आहे. आज रविवारी पहाटे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
या पार्टीच्या पार्श्वभूमीवर काही संशयास्पद घटना, तसेच कायदेशीर उल्लंघन झाल्याचा संशय असून पोलिस या प्रकरणाचा तपास गुप्तपणे आणि गांभीर्याने करत आहेत. पण गिरीश महाजन यांचे जाहीर आरोप आणि एकनाथ खडसे यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा कथित सहभाग यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
गिरीश महाजनांचे आरोप
गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना जे वक्तव्य केलं, त्यामुळं एकनाथ खडसे यांच्या जावयावर थेट आरोपांची मालिका सुरु झाली आहे. त्यांनी जाहीरपणे सांगितलं की, पार्टीमध्ये फक्त प्रांजल खेवलकर उपस्थित नव्हते, तर त्यांनीच ती आयोजित केली होती, ही माहिती मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं. काही झालं की एकनाथ खडसे दुसऱ्यांवर ढकलतात. जर खडसेंना ट्रॅपची भीती होती तर त्यांनी जावायाला अलर्ट करायचं होतं अशी प्रतिक्रिया गिरिश महाजन यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणामागे कोणते उच्चपदस्थ किंवा राजकीय संबंध आहेत का, असा संशय निर्माण होतो आहे.
त्यामुळे या प्रकरणी पोलीस आपलं काम करत आहेत. त्यामुळे सविस्तर माहिती येईपर्यंत थांबणं आवश्यक आहे. मात्र, अद्याप हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार हलका न मानता गंभीरतेने घ्यावा लागेल असं गिरीश महाजन म्हणाले.
काय करतात प्रांजल खेवलकर?
प्रांजल खेवलकर यांच्या प्रभावी व्यावसायिक कौशल्यामुळे त्यांना अनेक उद्योगांमध्ये सामावून घेतले आहे आणि त्यांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. साखर, वीज आणि रिअल इस्टेटपासून ते इव्हेंट मॅनेजमेंटपर्यंत त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये आघाडीची भूमिका बजावली आहे. त्यांची कंपनी संत मुक्तल शुगर अँड एनर्जी लिमिटेड, ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे आणि एपी इव्हेंट्स अँड मीडियाने इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. याशिवाय, त्यांची एक ट्रॅव्हल कंपनी देखील आहे.