
Raj Thackeray And Uddhav Thackeray Together : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. यंदाचा वाढदिवस त्यांच्यासाठी खूप खास ठरला त्याला कारण ठरले ते त्यांच्या भाऊ राज ठाकरे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज ठाकरेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेआपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी एका शब्दात सांगितले भविष्यकाळ कसा असेल? उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना वाढदवसांच्या शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे मातोश्रीवर जाणे हा अनेक अर्थांनी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. राज ठाकरे हे शिवसेनेत असताना अनेकदा मातोश्रीवर जायचे. लहानपणापासून ते बाळासाहेब ठाकरेंच्या सोबतच राहिले. बाळासाहेब ठाकरेंच्या सहवासात राज ठाकरेंची जडणघडण झाली. मात्र, शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे आणि मातोश्रीची ताटातूट झाली होती. शिवसेना सोडल्यानंतर आणि बाळासाहेबांच्या निधनानंतर राज ठाकरे आज पहिल्यांदाच राज मातोश्रीवर दाखल झाले.
शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे जेव्हा जेव्हा मातोश्रीवर गेले होते, तेव्हा काहीतरी अपरिहार्य कारण होते. मात्र, आता राज ठाकरे हे पहिल्यांदाच स्वखुशीने मातोश्रीवर गेले आहेत. या भेटीमुळे मराठी जनेमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे. इतच नाही तर हा महाराष्ट्रातील राजकारणाच्या नव्या अध्यायाचा श्रीगणेशा ठरण्याचीही शक्यता आहे. राज ठाकरेंच्या भेटीनतर उद्धव ठाकरे यांनी प्रतित्रिया दिली आहे. राज ठाकरे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्यानं कित्येक पटीनं आनंद झाला अशी भावना, उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. आपला आनंद द्विगुणित झाला आहे. ज्या घरात एकत्र आलो तिथे आम्ही एकत्र भेटलो यामुळे आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया उद्धव यांनी राज भेटीवर दिली.
नक्कीच पुढचा सर्व काळ चांगला होईल. आम्ही अनेक वर्षानी भेटलो. ज्या घरात वाढलो तिथे भेटलो. ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांच्या खोलीत गेलो. आज बऱ्याच वर्षाने राजने घरी येऊन शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषेत द्विगुणीत शब्द आहे. पण त्या पेक्षा कित्येक पटीने हा आनंद मोठा आहे असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे. दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच आहे. वसुधैव कुटुंबकम ही आपली परंपरा आहे, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर केलीये. दोन भाऊ भेटले म्हणून आमच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही, असंही दरेकर म्हणालेत.