
प्रताप नाईक झी 24 तास नांदणी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठात असणाऱ्या महादेवी हत्तीण गुजरातच्या वनतारा हत्ती केंद्रात पाठवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. या आदेशानंतर वनताराचे पथक नांदणी गावात महादेवी हत्तीणीला नेण्यासाठी आहे. हा क्षण अक्षरशः भावूक करणारा होता.
महादेवी हत्तीणीने अखेर नांदणी मठातील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टारक महास्वामी यांची भेट घेतली. हा क्षण प्रत्येकाला भावुक करणारा होता. या अखेरच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय आहे प्रकरण?
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठात असणाऱ्या महादेवी हत्तीन गुजरातच्या वनतारा हत्ती केंद्रात पाठवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. यानंतर वनताराचे पथक नांदणी गावात आल्याची माहिती मिळताच संतापाची लाट उसळली आहे. गावकरी आणि जैन धर्मियांनी एकत्र येत गावात मोर्चा काढला यावेळी मठातील महादेवी हत्तीन तुम्हाला घेऊन जायचं असेल आधी आमचे मूडदे बसवा मगच हत्ती घेऊन जा असा इशारा नांदणी गावातील ग्रामस्थ आणि जैन धर्मीयानी दिला होता..
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी इथल्या प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीनीला दोन आठवड्यात गुजरात मधील जामनगर इथल्या राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण केंद्राच्या ट्रस्टच्या हवाली करावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या निर्णयाविरोधात मठाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
नांदणी इथे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील तब्बल 748 गावांचा पुरातन मठ आहे. या मठाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. या मठा मार्फत अनेक दशकांपासून परंपरागतरित्या हत्ती सांभाळायला जातो. पण वनविभागाची परवानगी न घेता या हत्तीनीला मिरवणुकीत सहभागी केल्याचा आरोप प्राणी हक्कासाठी लढणाऱ्या पेटा संघटनेने केला होता. वास्तविक या हत्तीनीचा सांभाळ सर्व निकषणासार केला जात असताना महादेवी हत्तीला गुजरात मधील जामनगर इथे असणाऱ्या राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण केंद्राच्या ट्रस्ट मध्ये पाठवण्याचा अट्टाहास का केला जातोय असा सवाल विचारला जात आहे.
गावात वनताराचे पथक दाखल झाल्याची अफवा पसरल्यानंतर नांदणी ग्रामस्थ रात्रभर मोठ्या संख्येने मठ परिसरात जमा झाले. इतकच नाही तर आज जैन धर्मियांनी गावातून मोर्चा काढत महादेवी हत्तीनीला कोठेही हलवण्यास विरोध केला.. हत्ती हलवायचाच असेल तर आधी आमच्या पार्थिवावरून जावे लागेल असा इशारा दिलाय
स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थानचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील तब्बल 748 गावांचा आहे.ज्या मठामार्फत महादेवी हत्तीनीचा सांभाळ केला जातोय त्या मठाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. या मठा मार्फत अनेक दशकांपासून परंपरागतरित्या हत्ती सांभाळायला जातो.. असं असताना गुजरातच्या जामनगर इथल्या राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण केंद्रामध्ये हत्तीला पाठवण्याचे षडयंत्र का रचलं जातंय असा सवाल जैन धर्म विचारत आहेत
नांदणी मठाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशा विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितले आहे. त्यामुळे नेमकं काय होतं याकडे जैन धर्मियांचे लक्ष लागून राहिले आहे.. जामनगर मधील राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण केंद्राला हत्ती न्यायची हौस असेल तर त्यांनी मानवी वस्तीत धुडगूस घालणाऱ्या जंगली हत्तींना खुशाल घेऊन जाव असा सूर जैन धर्मियांचा आहे. सुप्रीम कोर्ट महादेवी हत्तीनी संदर्भात आता नेमकं काय निर्णय देत यावरच महादेवी हत्तीनीचं काय होणार हे स्पष्ट होणार आहे.