
Beed Crime News : नेहमी चर्चेत असणाऱ्या बीडमध्ये एक खळबळजनक प्रकार घडला आहे. एका डॉक्टरचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे. या डॉक्टरच्या मृतदेहाजवळ संशयास्पद वस्तू सापडल्आ आहेत. यामुळ डॉक्टरच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. पोलिस अधित तपास करत आहेत.
बीड शहरातील एका डॉक्टरचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संजय ढवळे असे या डॉक्टरचे नाव आहे, शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरात डॉक्टर संजय ढवळे हे भाड्याच्या खोलीत राहायचे. त्याच ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांच्या खोलीत भूल देणारे औषध आणि एक सिरिंज देखील आढळून आली आहे. त्यामुळे त्यांची आत्महत्या आहे की हत्या हे अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खोली मधील संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या आहे. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यांची हत्या की आत्महत्या याचा तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत. डॉक्टरचा मृतदेह आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्याच्या गळ्यात दोरखंड घालत आत्महत्येचा प्रयत्न केला.
कृषीमंत्री धुळे जिल्हा दौऱ्यावर असतांना युरियासाठी शेतकऱ्याच्या गळ्यात दोरखंड घालत आत्महतयेचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युरिया द्या अन्यथा गळफास लावतो असं सांगत एका शेतकऱ्याने कृषि केंद्रात फाशीचा घेम्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शिरपूर तालुक्यात युरिया खताचा तुटवडा जाणवत असल्याने एका शेतकऱ्याने गळ्यात दोरखंड टाकून कृषी सेवा केंद्रात युरिया द्या अन्यथा गळफास घेतो अशी धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली.
विशेष म्हणजे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्हा दौऱ्यादरम्यान असतांना शेतकऱ्यांकडून युरिया खतासाठी गळ्यात दोरखंड टाकावा लागल्याची दुर्दैवी बाब उघड झाली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे धुळे आणि नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते शिरपूर येथून नंदुरबारकडे रवाना झाले होते.यादरम्यानच शिरपूर तालुक्यातील कुवे येथील शेतकरी रवींद्र धोंडू पाटील हे काही शेतकऱ्यांसोबत शिरपूर येथील कृषी सेवा केंद्रात युरिया खत मागण्यासाठी गेले होते. मात्र, युरिया उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्यांनी तेथेच गळ्यात दोरखंड टाकून युरिया द्या अन्यथा आत्महत्या करू अशी धमकी दिली.गळ्यात दोरखंड टाकून कृषी सेवा केंद्रात शेतकरीच्या गळफासच्या धमकीमुळे गदारोळ झाला. घटनास्थळी तालुका कृषी अधिकारी दाखल झाले.तर सोबत काही शेतकरी उपस्थित होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी कृषीसेवा केंद्रात धाव घेत रवींद्र पाटील यांना समजावले आणि शेतकरी संतापाला वाट न जाऊ देता शांततेत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कृषी केंद्राचे संचालक व कृषी अधिकाऱ्यांनी युरिया उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले.