
महेंद्र मुधोळकर, झी मीडिया, बीड : (Beed News) बीडमधून मागील काही काळापासून धक्कादायक गुन्हेगारी कृत्य घडल्याच्या घटना समोर आल्या आणि सातत्यानं कायदा व सुव्यवस्थेसह स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणांवरही प्रश्न उपस्थित होत राहिले. एकिकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असतानाच आता बीडमधील आणखी एका क्रूर हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आल्यानं मानवी क्रूरता नेमकी किती खालच्या पातळीला जाऊ शकते हे लक्षात येत आहे.
बीडमधील परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल नुताच समोर आला. ज्यातून खळबळजनक माहिती तपास यंत्रणांसह सर्वांपुढं उघड झाली. महादेव मुंडे यांचा अगोदर गळा तब्बल 20 सेमी लांब, 8 सेमी रुंद आणि 3 सेमी खोल अशा भयानक वाराने कापण्यात आला. त्यानंतर त्यांच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार करण्यात आले.
शवविच्छेदन अहवालानुसार महादेव मुंडे यांच्या शरीरावर एकूण 16 गंभीर वार करण्यात आले होते. त्यांच्या हातावर जखमा असल्याने त्यांनी शेवटपर्यंत जीवाच्या आकांताने प्रतिकार केल्याचं अहवलातून स्पष्ट होत आहे. ही निर्घृण हत्या असल्याचं अहवालातून कळत असून, घटनेच्या दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन करण्यात आलं.
मृतदेहावर रक्ताने माखलेली बनियान, शर्ट, आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा होत्या. 20 महिने उलटूनही आरोपी निष्पन्न न झाल्याने, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्यायासाठी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले आहे.
शवविच्छेदन अहवालातील थरकाप उडवणारे मुद्दे…
• महादेव मुंडेचा गळा कापला; मानेवर उजव्या बाजूला 4 वार
• तोंड ते कानापर्यंत 1 खोल वार
• असे एकूण शरीरावर तब्बल 16 वार केले.
• महादेव मुंडे यांच्या शरीरावरील वाराने आरोपींची क्रूरता स्पष्ट
• मृत्यूचे कारण देखील आले समोर
हेसुद्धा वाचा : ‘माझ्यावर माझ्याच घरात… ‘, ओक्साबोक्शी रडली तनुश्री दत्ता; अभिनेत्रीची ही अवस्था झालीच कशी?
• या मारहाणीमुळे महादेव मुंडे यांच्या शरीरातून अतिरिक्त रक्तस्त्राव झाला.
• श्वसननलिका कापली, रक्तवाहिन्या तुटल्या
• मानेवर वार करताना घाव चुकला त्यामुळे तोंडावरून कानापर्यंत वार
• डाव्या व उजव्या हाताला अंगठ्याजवळ, तळहातावर, मधल्या बोटाजवळ वार
• डावा गुडघा खरचटलेला खाली पडल्यानंतर
•महादेव मुंडेंनी शेवटपर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.