
ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई: 2017 मध्ये शिवसेनेला आम्ही महापौर पद दिलं पण आता पुढे असं होईल की नाही हे सांगता येत नाही, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलंय. झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मराठी अस्मितेची चर्चा होतेय. हे सर्व जनतेने वेगळ्या अॅंगलने जनतेने पाहायला हवे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या मंडळींनी नेमकं काय केलं? मराठीसाठी आवश्यक ते ते सर्व काम केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने केल्याचे रविंद्र चव्हाण म्हणाले. मराठी भाषा भवन करण्याचं काम, मराठी विद्यापीठ निर्माण करण्याचं काम महायुती सरकारने केल्याचे रविंद्र चव्हाण म्हणाले. निवडणूक आल्यावर लोकांना भावनिक करण्याचं काम काही लोक वर्षानुवर्षे करतात. हे लोकांना समजायला हवं, असे ते म्हणाले.
नेत्यांनी टीआरपीच्या स्पर्धेत उतरू नये. आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढणार असल्याचे ते म्हणाले. कोण मोठा? कोण छोटा ? यापेक्षा आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय. हे तिघे रक्ताच्या भावाप्रमाणे काम करतायत. हे तिन्ही भावंडं महाराष्ट्राचे प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळत असतील तर राजकीय गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे ते म्हणाले. मागची निवडणूक आम्ही वेगळी लढलो पण निवडणुकीनंतर आम्ही एकत्र आलो. मुंबई पालिकेचे महापौर पद देण्याची वेळ आली तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला महापौर पद दिल्याचे ते म्हणाले. 2017 मध्ये शिवसेनेला आम्ही महापौर पद दिलं पण आता पुढे असं होईल की नाही हे सांगता येत नाही, असे ते म्हणाले.
फडणवीस घेतील तो निर्णय मान्य
आमच्यात कुठलंही शीतयुद्ध नाही. आमचे चांगले संबंध आहेत. काही मोजके प्रसंग सोडले तर सगळं व्यवस्थित आहे. गेल्यावेळी महापालिकेत आम्ही वेगळे लढलो आणि पुन्हा एक झालो. 2017 मध्ये मुंबईत सेनेला आम्ही महापौर पद दिलं होतं. पुन्हा असं होईल का सांगता येत नाही असे रविंद्र चव्हाण म्हणाले. महापौर पदाबाबत देवेंद्रजी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. आम्ही संघटना वाढीसाठी प्रत्येक करतोय असे ते म्हणाले. कोकणात प्रदेशाध्यक्ष पदावर त्यांनी यावेळी भाष्य केलं. शह काटशह या चर्चेत अनेक गोष्टी आहेत. रोजगार निर्मिती व इतर बाबतीत सरकारची भूमिका स्पष्ट आवश्यक आहे. वाढवण व इतर गुंतवणुकी आल्या आणि कामाला सुरुवात झाल्याचे ते म्हणाले.
स्वबळावर लढणार?
केंद्रीय नेतृत्व संदेश देत असतं. अमित भाईंनी दिलेल्या संदेशानुसार कार्यकर्त्यांनी संघटनात्मक पातळीवर बळकट होण्यासाठी तयारी करावी. महायुती सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतंय. 235 आमदारांचे बहुमत आमच्याकडे आहे. आपण जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी लोक भाजपात येतायत. तिन्ही पक्षांत लोक येतायत, असेही ते म्हणाले.
ठाकरेना महायुतीत स्कोप?
विधानभवनात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाली. यावेळी फडणवींसाकडून त्यांना ऑफर देण्यात आली. यावर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. काही गोष्टींची चर्चा करू नये. मी ते किंवा त्या ऑफरबाबत संभाषण ऐकलं नाही. विकासात्मक चर्चा करणं चूक नाही. चहा प्यायला बसलो तरी दहा मिनिटं लागतात. फडणवीस ठाकरेंमध्ये चाय पे चर्चा झाली असेल तर चांगलंच आहे. वारंवार अशा चर्चा होतोल. माझ्या पक्षाच्या हितासाठी जे काही करणे आवश्यक आहे त्या ठिकाणी चहा प्यायला मी नेहमी जाईन, असे रविंद्र चव्हाण म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचं भरभरून कौतुक देवेंद्र फडणवीस एक द्रष्टा नेता असून व्हिजन ठेऊन काम करण्याची त्यांची शैली आहे. महाराष्ट्राला अभिप्रेत असलेलं काम ते करतात. 28 हजार गावे त्यांनी दुष्काळमुक्त केल्याचे म्हणत रविंद्र चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केलं.
नरेंद्र-देवेंद्र-रविंद्र?
भाजपच्या कार्यकर्त्यांकडून नरेंद्र-देवेंद्र-रविंद्र या स्लोगनची चर्चा होतेय. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. मराठीत यमक असतात. मराठी अलंकारिक भाषा आहे. यमक लवकर प्रसिद्ध होतं पण या चर्चेला काहीही अर्थ नाही.मी लहान कार्यकर्ता आहे, जबाबदारीचे मला भान आहे. माझी तेवढी पात्रता नसल्याचे रविंद्र चव्हाण यावेळी म्हणाले.