
Success Story: कडू हा काल्याचा गुणधर्म आहे. पण हेच कडू कारलं कोणाला आयुष्य घडवण्यास मदत करत असेल तर? हो. कडू कारल्यामुळे सागर पाटील या तरुण शेतकऱ्याच्या आयुष्यात गोडवा निर्माण झाला आहे.पारंपारिक शेतीपेक्षा कारल्याची शेती फलदाजी असल्याचे शेतकरी सागरी पाटील यांनी सांगितले.गेल्या तीन वर्षांपासून सागर पाटील लाखो रुपये कारले उत्पादनातून घेत आहे.यंदा देखील सहा एकरात 8 ते 10 लाखांचे उत्पन्न सागर पाटील यांना अपेक्षित आहे.
कापूस, मका या पिकांना लागणारा खर्च आणि त्यापेक्षाही पारंपरिक शेतीतून 6 महिन्यांच्या कालावधीत मिळणारे उत्पन्नामुळे आर्थिक उत्पन्न गणितं कोलमडत. पारंपरिक पिकांमध्ये लागवडी पासून तर त्याला लागणारे खत, फवारणी यासह अनेक खर्चीक बाबींनतर सहा महिन्यांच्या कालावधी नंतर उत्पादनात येणारी घट व मिळणारे उत्पनाचा ताळमेळ बसत नाही. अशाने आर्थिकदृष्ट्या संकट येत असल्यामुळे शेतकरी सागर पाटील यांनी नगदी पिक म्हणून तीन वर्षांपूर्वी शेतात कारल्याचे उत्पादन घेण्याचे ठरवले.
पहिल्या वर्षापासून कारल्यांनी लाखोंचा नफा कमवून दिला असून विशेष म्हणजे दर दोन ते तीन दिवसाआड पैसा खेळता राहत असल्याने आर्थिक विवंचनेतून दूर होत असल्याचे शेतकरी सागर पाटील यांनी सांगितले. कारल्याची सगळ्यात जास्त मागणी वसई किंवा गुजरात मधील सुरत येथील बाजारात असल्याचे सागर पाटील यांनी सांगितले.
सुरत वाहतूकीला जवळ पडत असल्याने 20 ते 25 किलो पिशवीत कारली गडे करून शेतातूनच वाहनात टाकून गुजरातच्या सुरत येथे विक्रीसाठी पाठविले जातात. कारल्याला सध्या स्थितीत 50 ते 60 रुपये किलोचा भाव असल्याने पहिल्या दोन तेड्यातच यांना 50 हजारांचे उत्पन्न मिळाल्याचे शेतकरी सागर पाटील यांनी सांगितले.अशाच पध्दतीने भाव मिळाला तर यंदा 10 लाखांचे उत्पन्न सागर पाटील यांना अपेक्षित आहे.
सरकारी स्किममधून घेतलं 10 लाखांचं कर्ज, ‘असा’ उभारला यशस्वी फॅशन ब्रॅण्ड!
अनंत तंटेड मूळचे इंदूरचे आहेत. ते एक उद्योजक आहेत ज्यांनी त्यांच्या दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाने एक यशस्वी फॅशन ब्रँड उभारलाय. त्यांचे कुटुंब आधीच कापड व्यवसायात होतं पण अनंत यांनी स्वतःचा मार्ग स्वतः बनवण्याचा निर्णय घेतला. सुमारे 13 वर्षांपूर्वी म्हणजेच वयाच्या 23 व्या वर्षी अनंत यांनी या दिशेने पाऊल टाकले. त्यांनी सरकारी योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले. यासह त्यांनी बेंगळुरूच्या कोरमंगला येथे ‘द इंडियन गॅरेज कंपनी’ (TIGC) सुरू केली. सुरुवातीला त्यांच्यासोबत फक्त 4 लोक होते. आज TIGC एक मोठा ब्रँड बनला. त्याची उलाढाल सुमारे 220 कोटी रुपयांची आहे. बेंगळुरूमध्ये त्यांचे 20 हजार चौरस फूट एरियात कार्यालय आहे. त्यांच्या टीममध्ये 400 कर्मचारी आहेत. TIGC परवडणाऱ्या किमतीत डिझायनर-गुणवत्तेचे कपडे विकते.वडील कपडे वितरक असलेल्या अनंत यांनी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शर्ट विकले. यामुळे त्यांना व्यवसायाचा अनुभव मिळाला. तेव्हाच स्वतःचा कपड्यांचा ब्रँड लाँच करण्याचे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी त्यांच्याकडे जास्त भांडवल नव्हते. म्हणून त्यांनी सरकारी योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले. या मर्यादित भांडवलातून त्यांनी बंगळुरूतील कोरमंगला येथील एका छोट्या कार्यालयात ‘द इंडियन गॅरेज कंपनी’ (TIGC) सुरू केली. सुरुवातीला त्यांच्यासोबत फक्त 4 लोक होते.