
Lonavala Rape Case: गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचारांतदेखील काही दिवसांपासून वाढ होत आहे. लोणावळा शहरात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. लोणावळा शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लोणावळ्यातील स्थानिक तरुणीवर चालत्या गाडीत अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
लोणावळ्यातील एका तरुणीवर कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पीडित तरुणीला लोणावळा परिसरातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिच्यावर गाडी थांबवत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आले. नंतर आरोपीने तिला सामसूम असलेल्या रस्त्याच्या कडेला ढकलून देत तिथून पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा बलात्कार प्रकरणात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीला 12 तासांत अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शनिवारी हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित एकच खळबळ उडाली होती. तरुणीची वैद्यकीय तपासणी करत दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुंगार्ली येथील नारायणीधाम मंदिरापासून तरुणी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पायी जात असतानाच कारमधून आलेल्या तीन तरुणांनी तिचे तोंड दाबून तिला जबदरस्ती कारमध्ये बसवलं. त्या तिघांनी तिचे हात पाठीमागे बांधून तिचा मोबाईल काढून घेतला. त्यांनी तिचे कपडे काढून तिला विवस्त्र केले त्याचबरोबर तिला मारहाणदेखील केली. रात्री नऊ वाजल्यापासून तीन जणांनी कारमध्ये शनिवारी पहाटेपर्यंत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. यानंतर तिला नांगरगाव येथील एका रस्त्याच्या कडेला फेकले. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे.
सावत्र बापाचा विद्यार्थिनीवर बलात्कार
शहरातील विद्यादीप बालगृहातील आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सावत्र बापाने मुलीवर अत्याचार केल्याने ती बालगृहात दाखल होती. त्या वेळी तिचा काका (आरोपीचा भाऊ) बालगृहातील सिस्टरच्या मदतीने पीडितेला भेटायचा. त्याने मुलीला धमकावून कोर्टात बलात्कार झालाच नसल्याची खोटी साक्ष द्यायला भाग पाडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2023 पासून विद्यादीप’मध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीने दिलेल्या जबाबानुसार, तिच्यावर सावत्र पित्याने अत्याचार केला. त्यामुळे आरोपी अशफाक शेख हा हसूल कारागृहात शिक्षा भोगतोय. त्याचा भाऊ महेमूद गफार शेख हा मुलीचा सख्खा काका असल्याचे भासवून कमल सिस्टरच्या मदतीने बालगृहात येऊन पीडितेला तक्रार मागे घे असा दबाव टाकायचा. कोर्टातील सुनावणीवेळी कमल सिस्टर पीडितेला घेऊन गेल्या. त्या ठिकाणी वडिलांनी अत्याचार केला नसल्याचा जबाब महेमूद व कमल सिस्टरच्या मदतीने लिहून घेत कोर्टात सादर केल्याचं सांगण्यात येताय.