Phaltan Pandharpur Railway Project : महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम अति प्रचंड वेगाने सुरु आहे. यासाह विविध नविन रेल्वे मार्ग सुरु करण्यात येत आहेत. पण, महाराष्ट्रात एक असा रेल्वे मार्ग आहे ज्याचे काम तब्बल 102 वर्षांपासून रखडलेले आहे. ब्रिटीश काळात मंजूर झालेल्या या रेल्वे मार्गाचे काम अद्याप पर्यंत प्रत्यक्षात सुरु झालेले नाही. पंढरपूर फलटण हा रेल्वे मार्ग 102 वर्षांपासून रखडलेला आहे. आता रेल्वे मार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 45 दिवसांत हा रेल्वे मार्गी लागणार आहे.
ब्रिटिश काळापासून रखडलेल्या पंढरपूर फलटण रेल्वे मार्गासाठी सध्या सर्वेक्षण सुरू झाले आहे. 1923 साली रेल्वे मार्गासाठी पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील 18 गावांमध्ये झालेल्या भूसंपादन जमिनीचा सर्व्हे करण्यासाठी महसूल विभागातील तलाठी अभिलेख अधिकारी तसेच रेल्वेचे अधिकारी संयुक्तपणे सर्व्हे करून पुढील 45 दिवसात सोलापूर रेल्वे विभागाला अहवाल सादर करणार आहेत
ब्रिटिश काळात आखणी झालेल्या या मार्गावर रेल्वेने ब्रॉडगेज लाइन मंजूर केली आहे. त्यामुळे पूर्वीच्या संपूर्ण जागेची मागणी रेल्वेने केली आहे. 18 गावातील या जमिनीवर सध्या कोणाचा ताबा आहे, संबंधित खातेदार कोण आहेत, याची तपासणी सुरू आहे बार्शी लाईट रेल्वे कंपनीने 1923 साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात पंढरपुर लोणंद रेल्वे प्रकल्प हाती घेतला होता.
या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया देखील राबवण्यात आली. त्यावेळी पंढरपूर तसेच माळशिरस तालुक्यातील 18 गावातील शेतकऱ्यांकडून 807 एकर 10 गुंठे जमिनीचे भूसंपादन केले. पुढे प्रकल्प रखडले. पंढरपूर तालुक्यातील इसबावी, वाखरी, भाळवणी, भंडीशेगाव, धोंडेवाडी तसेच माळशिरस तालुक्यातील गुरसाळे, दहिगाव, धर्मपुरी, नातेपुते, पानीव, फॉडशिरस, मांडवे, विझोरी, वेळापूर, या गावात सर्वेक्षण सुरू आहे. याचा अहवाल रेल्वे विभागाला सादर होणार आहे.
