
Political News In Maharashtra: आपल्या वादग्रस्त वस्तव्यांबरोबरच थेट विधानसभेच्या सभागृहामध्ये मोबाईलवर पत्त्यांचा डाव खेळल्याचा आरोप करण्यात आलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना सध्या तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलासा दिल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार आणि कोकाटे यांची आज मंत्रालयामध्ये बैठक झाली. या बैठकीदरम्यान अजित पवारांनी कोकाटेंना चांगलेच फैलावर घेतलं. त्यांनी केलेल्या विधानांवरुन अजित पवारांनी त्यांची कानउघाडणी केली. मात्र त्यांच्याकडून कृषीमंत्रिपद काढून घेण्यात आलेलं नाही. तसेच ते काढून घेतलं जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र मंत्रालयामध्ये आपल्या पक्षाच्या सर्वच नेत्यांना अजित पवारांनी सूचक इशारा दिला आहे.
अजित पवार-कोकाटे भेटीत काय घडलं?
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा तूर्तास तरी घेतला जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटे यांना तूर्तास अभय मिळला आहे. केली जात आहे. अजित पवारांना भेटल्यानंतर कोकाटे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी गेले असून या बैठकीमध्ये अजित पवारांनी कोकाटेंना अशा वादग्रस्त विधानांमुळे पक्षाची बदनामी होत असल्याचं सांगितलं. तसेच ही अशी विधानं किती वेळा सहन करायची अशी विचारणाही अजित पवारांनी केल्याचं सांगितलं जात आहे. तसेच किती वेळा माफ करणार असं अजित पवारांनी विचारल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. यावर कोकाटेंनी पुन्हा असं होणार नाही अशी ग्वाही दिली असून सध्या तरी कोकाटेंकडून पद काढून घेतलं जाणार नसल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवारांनी सर्वच मंत्र्यांना काय इशारा दिला?
दरम्यान, कोकाटेंना भेटल्यानंतर अजित पवारांनी पक्षातील इतर नेत्यांचीही कॅबिनेटच्या बैठकीआधी छोटी बैठक घेतील. या बैठकीदरम्यान अजित पवारांनी सर्वच मंत्र्यांना सक्त ताकीद दिली आहे. सर्वच मंत्र्यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना भान ठेवावे. तसेच सहसा बोलणे टाळा, असं अजित पवारांनी आपल्या पक्षातील सहकारी मंत्र्यांना सांगितलं आहे. “महत्वाचे विषय असतील तरच बोला. तुमच्या एका शब्दाने पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. जर कोणी काही चुकले तर माझ्याकडे यायचे नाही, तिथून मागे फिरायचं,” असा सूचक इशारा अझित पवारांनी दिला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेनं काय म्हटलं?
उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या शिसवेनेची माणिकराव कोकाटेंसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. “आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. शेतक-यांचं अवमान होईल असं कोणतंही कृत्याचं आम्ही समर्थन करणार नाही,” असं उदय सामंत म्हणाले आहेत. “माणिकराव कोकाटेंसंदर्भात त्यांचे प्रमुख निर्णय घेतील,” असं उदय सामंत म्हणाले. परंतु अशा वक्तव्यामुळं महायुतीला नुकसान होतंय का? यावर उदय सामंत काहीच बोलले नाहीत.