
Fake Voting: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी गंभीर आरोप केलेत. बनावट आधार कार्ड बनवण्याचं प्रात्यक्षिकचं रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दाखवलंय. थेट डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्ड रोहित पवारांनी सर्वांसमोर बनवून दाखवलं. त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेवरून विरोधकांनी जोरदार रान उठवलंय.आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप केलेत. इतकंच नव्हे तर थेट डोनाल्ड ट्रम्प यांचं बनावट आधार कार्डच रोहित पवारांनी बनवून दाखवलंय.त्यामुळे अनेकांना धक्का बसलाय. अशा पद्धतीनं अनेक बनावट वेबसाईट्सच्या माध्यमातून आधार कार्ड बनवले जातात. आणि कुणीही मतदान करतं, याची कुणीच खातरजमा करत नाही, असा दावाही रोहित पवारांनी केलाय.यावर आता शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी पलटवार केलाय.
कर्जत-जामखेडमधील मतदार याद्यांसह सर्व कागदपत्रं आणून रोहित पवारांनी अनेक गंभीर आरोप केलेत.राज्यातील मतदार यादी आणि त्यातील अनेक मुद्यांवरूनही रोहित पवारांनी गंभीर आरोप केलेत.एका महिन्यात मतदारसंघात 4 हजार मतदार वाढले. अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावाही रोहित पवारांनी केलाय.
6 महिन्यात 48 हजार मतदार कसे वाढले, असा सवालही रोहित पवारांनी केलाय.देवांग दवेचा मुद्दा विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला होता.त्यावरून आता आमदार रोहित पवारांनीही अनेक आरोप केलेत.
राहुल गांधी यांनी देशपातळीवर मतचोरीच्या मुद्यावरून रान उठवलंय..गेल्या काही दिवसांपासून राज्यातही विरोधकांनी सत्ताधा-यांना याच मुद्यावरून कोंडीत पकडलंय. त्यामुळे आता येत्या काळात निवडणूक आयोगाकडून काय स्पष्टीकरण येतं हे पाहावं लागणार आहे.
FAQ
प्रश्न: रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत काय प्रात्यक्षिक दाखवले आणि त्याचा उद्देश काय होता?
उत्तर: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने बनावट आधार कार्ड तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. याचा उद्देश मतदार यादीतील घोटाळा उघड करणे असून, बनावट वेबसाइट्सद्वारे सहज आधार कार्ड बनवले जातात आणि त्यामुळे मतचोरी होत असल्याचा आरोप केला. हे प्रात्यक्षिक राज्यातील निवडणूक प्रक्रियेच्या कमकुवतपणावर बोट ठेवणारे होते.
प्रश्न: रोहित पवार यांनी मतदार यादीबाबत कोणते गंभीर आरोप केले आहेत?
उत्तर: रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील मतदार यादीतील घोळ उघड केले. एका महिन्यात ४ हजार मतदार वाढले आणि ६ महिन्यात ४८ हजार मतदार कसे वाढले असा सवाल उपस्थित केला. अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये अनियमितता असल्याचा दावा करत, हे मतचोरीचे संकेत असल्याचे सांगितले. यासह, देवांग दवे मुद्द्यावर विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांना पाठिंबा देणारे मुद्दे मांडले.
प्रश्न: रोहित पवारांच्या आरोपांवर शिवसेनेने काय प्रतिक्रिया दिली आणि निवडणूक आयोगाची भूमिका काय असू शकते?
उत्तर: शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी रोहित पवारांच्या आरोपांवर पलटवार केला असून, हे राजकीय खेळ असल्याचा दावा केला. राहुल गांधी यांनी देशपातळीवर मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला असल्याने राज्यातही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला आहे. येत्या काळात निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण अपेक्षित असून, मतदार यादीतील घोटाळ्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.