बीडमध्ये एका व्यक्तीला बॅटने मारहाण करणारा आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या याचे आणखी कारनामे उघडकीस येत आहेत. त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामधील एका व्हिडीओत खोक्या भाई विद्यार्थ्यांना हात पाय तोडण्याची धमकी देत आहे. शिरुरमधील कार्यक्रमात खोक्या भाईने ही धमकी दिली आहे.
बीडमधील खोक्या भाईचा आका कोण? कोण आहे हा सतीश भोसले? सुरेश धस कनेक्शन काय?
व्हिडीओत सतीश भोसले मैदानात विद्यार्थ्यांसमोर उभा असून त्यांना हात पाय तोडण्याची धमकी देत असल्याचं दिसत आहे. यावेळी त्याच्या हातात सोन्याचा कडा दिसत असून, भाईगिरी करताना दिसत आहे. दरम्यान दुसऱ्या एका व्हिडीओत तो पैशांची उधळण करताना दिसत आहे.
वन्य प्राण्यांची शिकार केल्याचंही उघड
लॅव्हिश लाईफ जगण्याबरोबरच खोक्याला हरण, ससा, मोर अशा वन्य जीवांचं मांस खाण्याचीही आवड होती. शेतात हरण पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यावरुन त्यानं दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली होती. त्याच्यावर दोन गुन्हे दाखल झाल्यानतंर तो फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथकं पुणे आणि अहिल्यानगर येथे रवाना झाली आहेत.
कोण आहे सतीश भोसले उर्फ खोक्या भाई?
बीडमधील मारहाणीचे आणखी दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान याप्रकरणी सतीश भोसलेवर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरु आहे. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला आहे.
एका व्यक्तीला बेदम मारहाण करतानाचा शिरुरमधील धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सतीश भोसले हा एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. दरम्यान या प्रकरणी सतीश भोसलेसह 4 जणांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– सतीश भोसले बीडच्या शिरूर शहराजवळीस पारधी वस्तीवर राहतो
– सतीश भोसले मित्रांसोबत लॅविश लाईफ जगतो
– गेल्या काही वर्षांपासून सक्रिय राजकारणात सहभाग
– भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक
– शिरूर कासार परिसरात सतीश भोसलेची खोक्या पार्टी नावानं दहशत
– गोल्डमॅन म्हणूनही स्थानिक पातळीवर सतीश भोसलेची ओळख
