
Sharad pawar on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांची विधाने ऐकलात तर राज्याच्या राजकारणाचे वारे नेमके कोणत्या दिशेने वाहतायत याचा अंदाज तुम्हाला लागणार नाही. काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यानंतर फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरची चर्चा रंगली. देवेद्र फडणवींसाच्या वाढदिवसाला शरद पवारांनी त्यांचे कौतुक केलंय. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. काय म्हणाले शरद पवार? सविस्तर जाणून घेऊया.
देवेंद्रांच्या कार्याची गती अफाट आहे, असे म्हणत शरद पवारांकडून देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महाराष्ट्र नायक’ पुस्तकात दिग्गजांकडून फडणवीसांचे कौतूक करताना ते बोलत होते. फडणवीसांचे कष्ट पाहून, ते थकत कसे नाहीत ? असा प्रश्न पडतो असे म्हणत शरद पवारांकडून फडणवीसांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. भविष्यात फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. एक प्रामाणिक व हुशार राजकारणी म्हणत ठाकरेंनी फडणवीसांवर स्तुतीसुमने वाहिली.
शिवसेना UBTचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.मराठी माणसाचं कल्याण करा.सूडाने वागून नका असा सलाही राऊत यांनी दोघांना दिल्या आहेत.
शिंदेंनी फडणवीसांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे
महाराष्ट्राच्या उध्दाराचा रात्रंदिन हा ध्यास असू देमहाराष्ट्राच्या विकासयात्रेचे बिनीचे शिलेदार मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा!
सर्व साथीदारांना खंबीरपणे पुढे नेणारे महायुतीचे अव्वल मित्र आणि… pic.twitter.com/tJFeStWs3J
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 22, 2025
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने फक्त राज्यच नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दोघांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा देताना लिहिलेल्या शब्दांनी लक्ष वेधून घेतलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे अशी साद घातली आहे. तसंच अजित पवारांचंही तोंडभरुन कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, “विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे. महाराष्ट्राच्या उध्दाराचा रात्रंदिन हा ध्यास असू दे. महाराष्ट्राच्या विकासयात्रेचे बिनीचे शिलेदार मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा”.पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “सर्व साथीदारांना खंबीरपणे पुढे नेणारे महायुतीचे अव्वल मित्र आणि सहकारी, जनतेचा आवाज बुलंद करणारे नेते, महाराष्ट्राच्या समृध्दीयात्रेत दमदार पावले टाकत सदैव पुढे असणारे मुख्यमंत्री, उत्तम प्रशासक, अर्थशास्त्र आणि कायद्याची जाण असलेलं बुध्दिमान तसेच ‘व्हीजनरी’ नेतृत्त्व. अनेक गुणांचा समुच्चय असलेल्या आणि सकारात्मकतेचं मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या मित्रवर्य देवेंद्रजी यांना दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना”.