
विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर, झी मीडिया : फुलंब्री तालुक्यातील खंबाट वस्ती पाथरी येथे नात्यातील 30 महिने, 9 वर्षीय आणि 11 वर्षीय बालकांना अचानकपणे लुळेपणा आणि अशक्तपणा आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. तीनही बालकांवर छत्रपती संभाजी नगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन बालकांवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहे तर एका बालकावर जनरल वार्ड मध्ये उपचार सुरू, हे तीनही बालक एकमेकांच्या नातेसंबंधात असल्याचे सांगण्यात येत आहे.
गावात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण आणि उपाययोजना सुरू करण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचे स्रोतही तपासण्यात येताय, , acute फ्लॅसीस पॅरॅलिसिस संशयित रुग्ण म्हणून आरोग्य विभागाने नोंद केली आहे. या तीनही बालकांना सारखेच लक्षणे असल्यामुळे नक्की प्रकार काय याबाबत आरोग्य यंत्रणा तपास करत आहे.
घटना कशी समोर आली?
एकाच कुटुंबातील तीन बालकांना हा त्रास सुरु झाला आहे. सर्वात अगोदर १२ जुलै रोजी ९ वर्षांच्या मुलाला अचानक अशक्तपणा आणि अर्धांगवायूमुळे छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर, १६ आणि १७ जुलै रोजी एका ११ वर्षांच्या मुलाला आणि ३० महिन्यांच्या मुलालाही अशीच लक्षणे आढळली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन मुलांवर सध्या पीआयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, तर ३० महिन्यांचे बाळ जनरल वॉर्डमध्ये आहे.
या घटनांनंतर, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने वडोदबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाथरीतील खमतवस्ती येथे सर्वेक्षण सुरू केले.
सर्व शक्यतांची तपासणी
आरोग्य विभागाने या प्रकरणाची चौकशी केली असून सर्व शक्यतांची तपासणी देखील केली आहे. सार्वजनिक नळाच्या पाण्याच्या पिण्याच्या चिंतेमुळे तात्पुरता पुरवठा बंद केला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गावात शुद्ध आणि निर्जंतुकीकरण केलेले पाणी पुरवठा केला जात असल्याची पुष्टी केली आहे. तसेच आरोग्य विभागाने मुलांमध्ये अॅक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस (एएफपी) चे संशयित रुग्ण नोंदवले आहे. एएफपी ही एक अशी स्थिती आहे जी पोलिओ आणि गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) यासह विविध रोगांशी संबंधित असू शकते, अशी शक्यता देखील वर्तवली आहे.