
Sant Yuvraj On Saibaba: शिर्डीच्या साईबाबांविषयी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. यावेळी हिंदू सेनेचे संत युवराज महाराज यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. देशभरातील हिंदू मंदिरांमधील साईबाबांची मूर्ती हटवा असं आवाहन, युवराज महाराज यांनी केलं आहे. याबाबतचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी साईबाबा संस्थानकडून शिर्डी पोलीस ठाण्यात युवराज महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
संत युवराज यांनी केलेले वक्तव्य हे आक्षेपार्ह असून साईभक्तांच्या भावना दुखावणारे आहे. देशभरातली हिंदू मंदिरातील साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचे अवाहन त्यांनी केलं आहे. साई मूर्तींना हातोड्याने तोडून गटारीत सोडा, साईबाबा मुस्लिम आणि व्याभिचारी असल्याचे संत युवराज यांनी म्हटलं आहे. संत युवराज यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. व्हायरल व्हिडिओनंतर शिर्डीत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
युवराज संत नावाच्या गृहस्थाने साईबाबांच्या मूर्ती हटवण्याबाबत बोलला आहे. इतकंच नव्हे तर त्याने काही अपशब्ददेखील वापरले. त्याने व्हॉट्स्अॅप नंबरदेखील दिला आहे. त्यावर मला फोन करा किंवा माझ्यावर गुन्हा दाखल करा, असं त्याने म्हटलं होतं. त्याची ही इच्छा शिर्डी साईबाबा संस्थानाने पूर्ण केली आहे. त्याच्याविरोधात साईबाबांची बदनामी केल्याप्रकरणी होणार गुन्हा दाखल होणार आहे.
संत युवराज नेमकं काय म्हणाले?
अनेक मंदिरात साईबाबांच्या मूर्ती आहेत. मुंबई, दिल्लीत, हैदराबादमध्ये त्यांची मंदिरे आहेत. गल्लीबोळातही त्यांची मंदिरे उभारण्यात आलेली आहेत. हे हिंदूंना काय झालंय? मी हिंदू सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा करतोय की, जुलैमहिन्याच्या आत हिंदू मंदिरातील साईबाबांची मूर्ती हटवा, असं वक्तव्य हिंदू सेनेचे युवराज महाराजांनी वादग्रस्त विधान केले आहे. साईबाबांच्या मूर्ती हातोड्याने तोडून गटारात टाका. नदीत मूर्ती टाकून ती परत मिळेल असं करु नका. प्रत्येक मंदिरातून या मूर्ती हटवा. जर तुम्ही मूर्ती काढली नाही तर आम्ही जबरदस्तीने हटवू. हे अभियान आम्ही फरिदाबादमधून सुरू केले आहे. साईबाबा मुस्लिम होते ते मासांहारी होते आणि व्याभिचारी होती. साईबाबा देव नाही, त्यांचाशी आपला काहीच संबंध नाही, असं वादग्रस्त टिप्पणीदेखील त्यांनी केली आहे.