
महेंद्र मूधोळकर (प्रतिनिधी) बीड : संतोष देशमुख प्रकरणात आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडेंचं (Dhananjay Munde) मंत्रीपद गेलं. त्यानंतर पहिल्यांदाच बीडमधील (Beed) राष्ट्रवादीच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. शेरोशायरीच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळापासून काहीसे लांब असलेल्या धनंजय मुंडेंनी अखेर मौन सोडलं आहे. बीडमधल्या राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात धनंजय मुंडेंनी गेल्या काही दिवसांतल्या घटनांर भाष्य केलं. वैर माझ्याशी होतं, मग बीडची बदनामी का केली, असा सवाल धनंजय मुंडेंनी केलाय.
मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंनी थेट इगतपुरी गाठून विपश्यना केली होती. तब्बल 200 दिवस कुठल्याच विषयावर आपण काहीच बोललो नसल्याचंही मुंडेंनी सांगितलं. शेरोशायरीच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी टोलेबाजी केलीय.
हेही वाचा : 2 मुख्यमंत्र्यांना रात्री घरात घुसून अटक करणाऱ्या अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा! त्यांचं वय पाहून बसेल धक्का
संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडवरून विरोधकांनी जाणीवपूर्वक आरोप केल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं. आजही मुंडेंच्या मनात ती खंत असल्याचं दिसून येतं.राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात भाषण करण्यासाठी धनंजय मुंडे व्यासपीठावर आले. तेव्हा कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे आगे बढो अशा घोषणा दिल्या, त्यावर मुंडेंनी मिश्किल टोलेबाजी केली.
संतोष देशमुख प्रकरणात झालेल्या आरोपांची धनंजय मुंडेंना किंमत मोजावी लागली. त्यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. गेल्या अनेक दिवसांपासूनची खदखद धनंजय मुंडेंनी बाहेर काढल्याचं बोललं जातंय.